अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सिनेइंडस्ट्रीत पुन्हा एकदा घराणेशाही आणि मक्तेदारीच्या मुद्द्यावरुन वाद सुरु झाला.त्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी करण जोहर, सलमान खान, सोनम कपूर, अनन्या पांडे सारख्या अनेक सेलिब्रिटींना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं. सोशल मिडियावरील या वातावरणामुळे अनेक सेलिब्रिटींनी त्यांचं अकाऊंट खाजगी केलं तर काहींनी काही काळासाठी डिऍक्टीव्ह केलं. करण देखील सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या सोशल मिडियावर ऍक्टीव्ह नाहीये. आता तर असं कळतंय की खास बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी करण जोहरने एक सिक्रेट खाजगी अकाऊंट बनवलं आहे.
करण जोहर पहिल्यांदाच घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन ट्रोल होतोय असं नाही. तो याआधी देखील या मुद्द्यांवरुन ट्रोल झाला आहे. मात्र यावेळी सुशांतचे चाहते त्याला वाट्टेल तसं बोलत आहेत. नुकतंच इंस्टाग्रामवर करण जोहरच्या नावाचं एक अकाऊंट दिसून आलं आहे. 'karanaffairs' असं या अकाऊंटच नाव आहे. मात्र हे एकाऊंट अधिकृत केल गेलेलं नाहीय. आश्चर्याची बाब म्हणजे करणच्या या अकाऊंटला शाहरुखची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन, आणि अनन्या पांडे हे फॉलो करत आहेत. यावरुन आता असा अंदाज बांधला जातोय की बॉलीवूड सिलेब्रिटींसाठी करणने आता एक खाजगी अकाऊंट सुरु केलं आहे.